• Sun. Oct 19th, 2025

पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टेबाजी ! पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या, मोबाईल, रेसिंग बुक जप्त



पुण्यात घोड्यांच्या शर्यतीवर सट्टेबाजी ! पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या, मोबाईल, रेसिंग बुक जप्त

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे तिथे काय उणे अशी म्हण प्रचलित आहे. त्यामुळे पुण्यात ज्या काही घटना घडतायेत त्यावरून ही म्हण तंतोतंत जुळून येत आहे. पुण्यातील फातिमानगर भागात घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टा घेणार्‍या चौघा जणांना वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल, रेसिंग बुक असा ५५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मेहमूद इब्राहिम शेख, फैज मेहमूद शेख (वय २९, दोघे रा. फातिमानगर, वानवडी), चाँद शमशुद्दीन शेख (वय २९, रा. वानवडी), अकबर अन्वर खान (वय ४६, रा. लष्कर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीराम नवमीनिमित्त वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करुन अवैध धंद्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे व त्यांच्या सहकार्‍यांना बातमी मिळाली की फातिमानगर येथे घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाईन सट्टेबाजी सुरु आहे. त्यानंतर पोलिसांनी फातिमानगर येथील बालाजी दर्शन येथील फ्लॅटवर छापा टाकला. तेथे मेहमुद शेख हा त्याचे ओळखीच्या ग्राहकांकडून रेसकोर्सच्या घोड्यांवर जुगार घेत होता. तो फैज मेहमुद शेख, चाँद शमशुद्दीन शेख व अकबर खान यांच्याकरवी भारतात ऑनलाईन रिंगवर जुगार लावून व पैशांची देवाण घेवाण करताना मिळून आले. त्यांच्याकडून सट्टेबाजीसाठी वापरलेले मोबाईल, रेसिंग बुक व इतर साहित्य असा ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. घोड्यांच्या शर्यतीवर ऑनलाइन सट्टेबाजीस बंदी आहे. आरोपी मेहमूद ऑनलाइन सट्टेबाजीचे सर्व व्यवहार सांभाळायचा. सट्टेबाजांना शर्यत संपल्यानंतर पैसे दिले जायचे. मुंबईतून दर सोमवारी पैसे मिळायचे. हे सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने मोबाइलवर सुरू होते.

सदर कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोंविद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार सोमनाथ कांबळे, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण व बालाजी वाघमारे यांनी केली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें