• Sun. Oct 19th, 2025

भाजपचे दोन आमदार अडचणीत, न्यायालयाची नोटीस, आमदारकी रद्द होणार?



भाजपचे दोन आमदार अडचणीत, न्यायालयाची नोटीस, आमदारकी रद्द होणार?

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – नागपूर जिल्ह्यातील भाजपचे दोन आमदार सध्या अडचणीत सापडले असून, त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप आहे. हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि काटोल मतदारसंघाचे आमदार चरणसिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही आमदारांना तीन आठवड्यांच्या आत आपला जबाब सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगणा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार रमेशचंद्र बंग यांनी आमदार समीर मेघे यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये निवडणुकीत आचारसंहिता व निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सलील देशमुख यांनी भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या विरोधात अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांमध्ये संबंधित आमदारांच्या निवडीला अवैध ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे दोन्ही आमदारांची राजकीय अडचण वाढली असून, न्यायालयीन प्रक्रिया पुढील काही आठवड्यांत या प्रकरणातील दिशा स्पष्ट करेल, असे सांगण्यात येते. मात्र न्यायालयाच्या नोटिशीनंतर भाजप आमदारांच्या अडचणीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें