• Fri. Feb 6th, 2026

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने खातं उघडलं; कपिल पाटलांचा पुतण्याची बिनविरोध निवड



काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने खातं उघडलं; कपिल पाटलांचा पुतण्याची बिनविरोध निवड

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पहिला विजय मिळवला आहे.प्रभाग समिती क्रमांक १७ ब मधील भाजपा उमेदवार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पुरुषोत्तम पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयानंतर पुरुषोत्तम पाटील यांच्या मान सरोवर येथील निवासस्थानी विजय जल्लोष करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सुमित पाटील व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे अभिनंदन करीत हा विजय भिवंडीतील विजयाची नांदी ठरेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत.विशेष म्हणजे २४ वर्षांच्या दरम्यान झालेल्या चार निवडणुकीत कोणीही बिनविरोध विजयी झाला नव्हता तो विक्रम भाजपाचे सुमित पाटील यांनी पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत केला आहे.त्यामुळे या निकालाची प्रचंड चर्चा आहे. तसेच पुरुषोत्तम पाटील यांची पहिल्यांदा २०१२ मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ते दुसऱ्यांदा जनतेतून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले होते. तर तिसऱ्यांदा आता बिनविरोध निवडून आले आहेत.

दरम्यान भिवंडी निजामपुर महापालिकेत २३ वॉर्डमधील ९० जांगावर निवडणुक पार पडणार आहे. या ९० पैकी भिवंडी महानगरपालिकेसाठी अनुसूचित जाती – ३ जागा त्यापैकी २ जागा महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) – १, सर्वसाधारण एसटी जागा आरक्षित आहे. मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) – २४ जागा आहेत.त्यातील १२ जागा ओबीसी महिला यांच्यासाठी राखीव असणार आहे. सर्वसाधारण – ६२ जागा, त्यातील ३१ जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. भिवंडी महापालिकेलसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान पार पडणार आहे. तर निकाल १६ जानेवारी २०२६ ला लागणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें