• Thu. Apr 2nd, 2026

व्हीआरएस कंपनीसंदर्भात मोठी बातमी; शिंदे गटाचे नेते, मंत्री आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही



व्हीआरएस कंपनीसंदर्भात मोठी बातमी; शिंदे गटाचे नेते, मंत्री आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांसह इतर नेतेही या विमान अपघाताबाबत अनेक संशय निर्माण करत आहे. त्यातच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आता चांगलेच आक्रमक झालेले आहे. डी जीसी एच्या संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. असे असताना व्हीआरएस कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री हे आता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मान्य करण्यात आल्याची माहिती आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघातानंतर व्हीआरएस कंपनीवर अनेक गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केले होते. दरम्यान त्यात काही गोष्टी तथ्य असल्याचेही पुढं आलं होतं. अशातच आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्हीआरएस कंपनीबाबत सातत्याने नवंनवीन दावा करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंकडून सूचना केल्या होत्या. अशातच या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेता हि मागणी मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकीच तत्परता व्हिएसआर संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलंय. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें