• Fri. Oct 9th, 2026

दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश



दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

योगेश पांडे / वार्ताहर

अमरावती : दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे यांच्यासह १९ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशामुळे दर्यापूरमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शुक्रवारी झालेल्या प्रवेश सोहळ्यात अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके, त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष तसेच कर्नाटकातील बेळगाव येथील विविध पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी एकनाथ शिंदे यांनी दर्यापूरच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे सांगत नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विदर्भात संघटनवाढ होत असून विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे वाढता ओढा हा जनविश्वासाचे द्योतक असल्याचा दावा शिंदे यांनी केला.

या सामूहिक पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात विदर्भातील शिवसेनेची ताकद वाढण्याचे संकेत मिळत आहेत.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें