• Thu. Oct 8th, 2026

अमराठी चालकांनी मराठी शिकावे; १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेणार नाही : प्रताप सरनाईक



अमराठी चालकांनी मराठी शिकावे; १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेणार नाही : प्रताप सरनाईक

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : महाराष्ट्रात व्यवसाय करताना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी अमराठी रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहनचालकांनी व्यावहारिक मराठी शिकावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरातील १८० हून अधिक केंद्रांवर सुमारे १,८०० शिक्षकांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले.

राज्यात अद्याप सुमारे आठ ते नऊ लाख अमराठी चालक कार्यरत असल्याने अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. संबंधित चालकांनी प्रशिक्षण वर्गात नोंदणी करावी किंवा ऑनलाइन पद्धतीने मराठी शिकावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ व्हावा आणि महाराष्ट्राची भाषा व सामाजिक सलोखा जपला जावा, हा अभियानाचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें