• Thu. Apr 2nd, 2026

शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती



शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर गेल्या काही दिवसांपासून ते आपल्या बारामती, मुंबई आणि पुण्यातील घरी दौरे करत होते. तर, राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी येत. दरम्यान, सोमवारी शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी क्लिनिकमध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं आहे.

शरद पवारांना खोकल्याचा त्रास होत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉक्टर परवेझ ग्रँट यांना तसे कळविण्यात आले आहे. डॉक्टर परवेझ ग्रँट तपासणीनंतर शरद पवारांना एडमिट करायचे की उपचार करून घरी पाठवायचे याबाबतचा पुढील निर्णय घेतील. शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासमवेत रुबी हॉस्पिटलमध्ये आहेत. दरम्यान,सोमवारी सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टर ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ.”, असे डॉक्टरांनी सांगितले.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें