• Sun. Dec 14th, 2025

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड! पुण्यात विकासाच्या मुद्द्यावर अखेर दोन्ही शिवसेना एकत्र



राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड! पुण्यात विकासाच्या मुद्द्यावर अखेर दोन्ही शिवसेना एकत्र

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आली आहे. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडत आहे अन् त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्या आहेत. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळं ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं हा चाकण पुरता तो ही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलंय.

पुण्याच्या चाकणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेना एकत्र आल्यात. विकासाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाल्याचं शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांनी सांगितलं आहे. विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही सेना एक झाल्याचे ते म्हणाले.

पुण्याच्या चाकण नगरपरिषदमध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली असून महायुती मधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापले वेगवेगळे पॅनल तयार केले आहे. महाविकास आघाडी मधील ठाकरे शिवसेना पक्षाचा आमदार असूनही नगरपरिषदेमध्ये पॅनल करणासाठी उमेदवारच मिळाले नसल्याने तुटक जागांवर महाविकास आघाडीने शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्ष पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. चाकण नगरपरिषद नगराध्यक्ष पद हे महिले साठी आरक्षित असल्याने या ठिकाणी महायुतीमध्येच मोठी चुरस पाहायला मिळते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें