ठाण्यात भाजपने बॉम्ब टाकला; थेट महापौर पदासाठी नावं केलं घोषित
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण गुरुवारी अधिकृतपणे निश्चित करण्यात आले असून, त्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या ठाणे महानगरपालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
ठाणे महानगरपालिका ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानली जाते. त्यामुळे येथील महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने आता या प्रवर्गातील नगरसेवकांपैकी कोणाला महापौरपदाची संधी मिळणार? याबाबत चर्चा सुरू झाली.
आरक्षण सोडत जाहीर होताच भाजपने वेगाने हालचाली करत महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेले नगरसेवक सुरेश कांबळे यांचे नाव भाजपकडून महापौरपदासाठी सुचवण्यात आले आहे.महापौरपदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता पुढील टप्प्यात गटनेत्याची निवड, अधिकृत गटनोंदणी आणि त्यानंतर महापौर निवडीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे.

