• Fri. Jun 19th, 2026

बेस्टच्या १२ कामगार संघटनांचा बेमुदत संपाचा इशारा; मुंबईतील बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता



बेस्टच्या १२ कामगार संघटनांचा बेमुदत संपाचा इशारा; मुंबईतील बससेवा विस्कळीत होण्याची शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमातील १२ कामगार संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र येत बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. ‘बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती’च्या माध्यमातून १८ जूनच्या मध्यरात्रीपासून संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली असून त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील बससेवा तसेच अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा बेमुदत संप पुकारला जाईल, असा इशारा समितीने दिला आहे. या आंदोलनात वाहतूक व विद्युत पुरवठा विभागातील कर्मचारीही सहभागी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व शाखा व विभागप्रमुखांना कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर न करण्याचे निर्देश दिले आहेत. परिवहन सेवा आणि विद्युत पुरवठा या दोन्ही सेवा अत्यावश्यक सेवांच्या श्रेणीत येत असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें