• Sat. Aug 8th, 2026

सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा



सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाचा झटका; राष्ट्रवादीच्या घटनेतील बदलांवर मागितला तातडीने खुलासा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक महत्त्वाचे पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. पक्षाच्या घटनेतील काही महत्त्वपूर्ण बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्रे आणि ठराव अपूर्ण असल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. यासंदर्भात तातडीने खुलासा सादर करण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 18, 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र, या बदलांना पुष्टी देणारे अधिकृत ठराव आणि आवश्यक कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली नाहीत, असे आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने २७ जुलै २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना हे अधिकृत पत्र पाठवले. पत्रात स्पष्ट केल्यानुसार, पक्षाने घटनेतील अनेक महत्त्वाच्या बदलांना समर्थन देणारी वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर केलेले नाहीत.

आयोगाच्या माहितीनुसार, पक्षाच्या २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावात केवळ कलम 18(1) मधील दुरुस्तीचा स्पष्ट उल्लेख आढळतो. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारात पक्षाने कलम 6, 7, 12, 32 आणि ३६ मध्येही मोठे बदल केले आहेत. या इतर कलमांमधील बदलांना मान्यता देणारे अधिकृत प्रस्ताव आणि कागदपत्रे आयोगाला अद्याप प्राप्त झालेली नाहीत.

निवडणूक आयोगाने या सर्व घटनात्मक दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्रे आणि अधिकृत ठराव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी केली आहे. पक्षाकडून ही सर्व प्रलंबित कागदपत्रे आणि स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतरच आयोग या बदलांवर अंतिम निर्णय घेणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें