• Thu. Oct 8th, 2026

कलिना ग्रंथालय प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा



कलिना ग्रंथालय प्रकरणात छगन भुजबळांची निर्दोष मुक्तता; सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : कलिना ग्रंथालय प्रकरणात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुरेसे पुरावे नसल्याने भुजबळ यांच्यासह तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सावंत, कार्यकारी अभियंता हरीश पाटील आणि सीए रवींद्र सावंत यांचीही न्यायालयाने सुटका केली.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील सुमारे चार एकर जागेच्या वापरासंदर्भात हे प्रकरण होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन मंत्री असताना भुजबळ यांनी विकासकाला ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर जागा देताना कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला होता.

न्यायालयाने उपलब्ध आरोप व पुराव्यांचा विचार केल्यानंतर आरोपींना निर्दोष मुक्त केले. या निर्णयामुळे भुजबळ यांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें