• Fri. Feb 6th, 2026

स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ओळख; प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर अत्याचार, गर्भपातास भाग पाडल्याचा आरोप



स्पर्धा परीक्षेच्या तयारीदरम्यान ओळख; प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणीवर अत्याचार, गर्भपातास भाग पाडल्याचा आरोप

पोलीस महानगर नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि त्याचा अखेर भयानक परिणाम एका तरुणीला भोगावा लागला. प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने (पीएसआय) कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार केल्याचा आणि नंतर खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्ती गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांनी आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर याच्यासह त्याच्या वडिलांवर आणि बहिणीवरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित महिला आणि आरोपी दोघेही मूळचे परभणी जिल्ह्यातील असून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी संभाजीनगरात राहात होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने ओळख झाली; त्यानंतर आरोपीने २०२४ च्या फेब्रुवारीत अजबनगर परिसरातील एमएच-२० कॅफेत नेऊन पीडितेवर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे.

अत्याचारानंतर पीडिता गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच दबाव आणत गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गर्भपातानंतर आरोपीने पीडितेशी संपर्क तोडत तिला ब्लॉक केले आणि त्याचदरम्यान तो पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.

महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनीही उलट धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे अखेर पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली.

तक्रारीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-२० कॅफेसह संबंधित ठिकाणांचा पंचनामा केला. मिळालेल्या पुराव्यांवरून प्रकरणाची गंभीरता अधिक ठळक झाली आहे. घटना उघड होईपर्यंत पोलिसांनी गोपनीयता राखली; मात्र प्रकरण प्रकाशात येताच राज्यभर या अमानुष प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें