• Thu. Apr 2nd, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या महापौरांनी पदभार स्वीकारला



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्याच्या महापौरांनी पदभार स्वीकारला

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक ३ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौरपदी, तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकृतरीत्या पदभार स्वीकारला.

या वेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. पदभार स्वीकार समारंभात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमहापौर कृष्णा दादू पाटील तसेच शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांचे स्वागत करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें