• Fri. Jun 5th, 2026

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात;स्वतः एक्सवर पोस्ट करत दिली माहिती



मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात;स्वतः एक्सवर पोस्ट करत दिली माहिती

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला शनिवारी रात्री अपघात झाला. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झाला असून, सुदैवाने या कारमधून प्रवास करणाऱ्या कोणालाही इजा झालेली नाही. सर्व जण सुखरूप असल्याची माहिती दिली जात आहे. याबाबतची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट करत या अपघाताबाबत माहिती दिली आहे. पुणे ते मुंबई प्रवास करत असताना, महामार्गावर मला एक अत्यंत वाईट अनुभव आला; एका बेपर्वा चालकामुळे एका कारची माझ्या कारच्या बाजूला जोरदार धडक बसली. सुदैवाने, सर्वजण सुखरूप आहेत. अशा घटना एक गंभीर आठवण करून देतात की, आपल्या रस्त्यांवर होणारा अतिवेग आणि निष्काळजीपणा यामुळे असंख्य जीवांना धोका निर्माण होऊ शकतो.

मी प्रत्येकाला आवाहन करते की, त्यांनी सीट बेल्ट वापरावेत, सावध राहावे आणि जबाबदारीने वाहन चालवावे; जेणेकरून आपले महामार्ग सर्वांसाठी अधिक सुरक्षित बनतील, असे सुप्रिया सुळे यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. या अपघातात सुप्रिया सुळे यांच्या गाडीचे थोडे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे कुटुंबातील एका कार्यक्रमासाठी मुंबईहून मुरबाड येथे जाणार होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या पायलटने वेळीच प्रसंगावधान दाखविल्याने ते वळवून जुहू पवनहंस येथे आणून त्याचे यशस्वीपणे लँडिंग करण्यात आले. या घटनेत कुणालाही कोणतीही इजा झाली. यानंतर आता लगेचच सुप्रिया सुळे यांच्या अपघाताची माहिती समोर येत आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें