अवैध डिझेल वाहतुकीवर आष्टी पोलिसांचा घाव; ₹७.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
पोलीस महानगर नेटवर्क
गडचिरोली, प्रतिनिधी : अवैध डिझेल वाहतुकीविरोधात आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून १,५०० लिटर डिझेलसह जॉन डीअर ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण ₹७ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या डिझेलची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. तपासणीदरम्यान आरोपीकडून मोठ्या प्रमाणात डिझेल वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत १,५९९ लिटर डिझेल, तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला जॉन डीअर ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ₹७.५८ लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
गडचिरोली पोलीसांनी स्पष्ट केले आहे की, कायद्याचे उल्लंघन करून इंधनाची अवैध वाहतूक, साठवणूक किंवा विक्री करणाऱ्यांविरोधात अशाच कठोर कारवाया भविष्यातही सुरू राहतील. या कारवाईमुळे अवैध इंधन व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

