मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाकुंभमेळ्याला हजेरी; सहकुटुंब केलं गंगेत पवित्र स्नान
योगेश पांडे / वार्ताहर
प्रयागराज – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यावर पोहोचले या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक , अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लादेखील बैठकीला हजर होते. यावेळी या बैठकीत नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयात आढावा घेण्यात आला. दरम्यान, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला हजेरी लावली.आस्थेचा कुंभ..महाकुंभ, सनातन संस्कृतीची अविरत परंपरा..! तीर्थराज प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्याचे अहोभाग्य.. अशा आशयाची पोस्ट शेयर करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंगेत डुबकी मारत पवित्र स्नान केलं. यावेळी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी देखील उपस्थित होती.