अजितदादांच्या ताफ्यावर मधमाशांचा हल्ला, पोलीस, अन् अधिकाऱ्यांचा घेतला चावा
योगेश पांडे / वार्ताहर
रत्नागिरी – मोठी बातमी समोर येत आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतला, या घटनेत ते जखमी झाले आहेत. अजित पवार हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे. कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केल्यामुळे ताफ्यातील अनेकांची चांगलीच धावपळ उडाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलं. घटनेबाबत मिळालेल्या माहितिनुसार, रविवारी अजित पवार हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कसबा गावातील सरदेसाई वाड्याची पाहणी करताना संगम मंदिर परिसरात ही घटना घडली. अचानक मधमाशांनी हल्ला केला. अजित पवार यांच्या ताफ्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना या मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे एकच धावपळ उडाली, अजित पवार यांना सुरक्षित गाडीमध्ये बसवण्यात आलं.
दरम्यान सरदेसाई वाड्याची पाहणी करताना मधमाशांनी हल्ला केला, मधमाशांचा अचानक हल्ला झाल्यामुळे अजित पवार यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली, मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावासाठी कर्मचाऱ्यांना चांगलंच पाळवं लागलं, काही जणांनी आपल्या हातमधील उपरण्यांनी मधमाशांना दूर हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील यातील काही कर्मचाऱ्यांना मधमाशांनी चावा घेतलाच.