• Sun. Oct 19th, 2025

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का, माजी महापौरांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’



महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का, माजी महापौरांचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई महापालिकेसह इतरही महापालिकांच्या निवडणुका तोंडावर असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने देखील विधानसभेचा पराभव विसरून सेनेच्या शाखाध्यक्ष, विभागप्रमुखांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्याचे निमंत्रणे दिली जात आहेत. गेल्या सहा महिन्यात नाही नाही म्हणता ठाकरे सेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. महापालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना मुंबईचे माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. घरगुती कारणामुळे आपण पक्ष सोडत असल्याचे दत्ता दळवी यांनी सांगितले.

विक्रोळी विधानसभेतील आमदार सुनील राऊत यांच्या जवळचे सहकारी, माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह विक्रोळी विधानसभेतील महिला पदाधिकारी आणि इतरही पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. दत्ता दळवी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. मी माझ्या घरगुती कारणामुळे माझ्या उपनेतेपदाचा राजीनामा देत आहे, असे उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दत्ता दळवी यांनी म्हटले आहे. दळवी यांच्या शिंदेगटातील प्रवेशामुळे ईशान्य मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें