• Sun. Oct 19th, 2025

रविवारी २९ जूनला हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्याची उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश



रविवारी २९ जूनला हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्याची उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शालेय अभ्यासक्रमात हिंदी सक्तीच्या निर्णयावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. अशातच आता २९ जूनला सरकारच्या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले आहे. हिंदी भाषेला आपला विरोध नाही मात्र सक्तीला विरोध आहे. आम्ही मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही. हिंदी सक्ती विरोधात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात आंदोलन करा आणि हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी आंदोलन करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी दुपारी ३ वाजता शिवसेनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्याचे ठाकरे यांनी आवाहन केले, तसेच शालेय शिक्षण विभागाकडून हिंदी सक्तीचा शासन अध्यादेश काढण्यात आला आहे त्याची होळी करा असं उद्धव ठाकरेंनी जिल्हाप्रमुखांना सांगितले. राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याच्या धोरणावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ५ जुलै रोजी हिंदीविरोधी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरात शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांना राज्यातील हिंदी सक्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘पहिली ते चौथीपर्यंत हिंदीची सक्ती करणं योग्य नाही, तसेच हिंदीला दुर्लक्षीत करूनही चालणार नाही. पाचवीपासून हिंदी योग्य आहे. पहिली ते चौथीपर्यंत एकदम नवीन भाषा लादणं योग्य नाही.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें