• Sun. Oct 19th, 2025

“एक थेंब रक्त… हजारो जीवांचं जीवन!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न 



“एक थेंब रक्त… हजारो जीवांचं जीवन!”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न 

मुंबई – महाराष्ट्राचे लाडके नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक आणि मानवतावादी उपक्रम म्हणून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर २२ जुलै २०२५ रोजी सायन कोळीवाड्यातील रावळी कॅम्प गुरुद्वारा येथे पार पडले. या उपक्रमाचे आयोजन मा. आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

“एक थेंब रक्त… हजारो जीवांचं जीवन!” या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित या शिबिरात सुमारे ५०० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

या कार्यक्रमाला मुंबई भाजपचे उपाध्यक्ष मा. रवी राजा साहेब, विविध मंडळ अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, तसेच असंख्य भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. रक्तदान हे केवळ वैद्यकीय गरजा भागवणारे नव्हे, तर समाजात माणुसकी, सहकार्य आणि एकात्मतेचा संदेश देणारे कार्य आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी बळकट होते आणि नव्या पिढीत समाजसेवेची प्रेरणा जागवली जाते. या शिबिरामुळे रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांना नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे या उपक्रमाचे खरे यश म्हणावे लागेल.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें