• Sun. Oct 19th, 2025

माजी उपराष्ट्रपती धनखड यांना शोधण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल – संजय राऊत



माजी उपराष्ट्रपती धनखड यांना शोधण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल – संजय राऊत

जगदीप धनखड यांच्यासाठी ‘सुप्रीम’ शोध मोहिम; संजय राऊतांच्या दाव्याने एकच खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई– माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याच्या धक्क्यातून देश सावरलेला नाही. पावसाळी अधिवेशन सुरू होताच दिल्लीत कोणता ‘गेम’ झाला याची गोम काही समोर आली नाही. पण त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने दिल्लीच्या राजकारणात काही तरी मोठी घडामोड घडली हे उघड गुपीत कोणी सांगायला तयार नाही. विरोधक तर या राजीनाम्यामागील कारण समोर आणावं अशी वारंवार मागणी करत आहे. त्यांनी राजीनामा देणं आणि तो तात्काळ मंजूर करून घेणं हा घटनावेग संशयाला जागा निर्माण करणारा असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्यातच रविवारी खासदार संजय राऊत यांनी तर मोठा बॉम्ब टाकला. त्यांनी जगदीप धनखड कुठे गायब झाले याचा शोध घेणार असल्याचे सांगितले. त्यासाठीचा जालीम उपाय पण सांगितला. रविवारी पत्रकार परिषदे खासदार संजय राऊत यांनी अनेक विषयांवर नेहमीप्रमाणे तुफान बॅटिंग केली. फ्रंटफुटवर खेळण्यात त्यांचा कोणी हात धरत नाही. रविवारी त्यांनी विस्मृतीत गेलेला धनखड यांचा मुद्दा उकरून काढलाच. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर अचूक निशाणा धरला. २१ जुलैपासून धनखड हे काही केल्या दिसले नाहीत, असा चिमटा त्यांनी काढला. पावसाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम होती संध्याकाळी ६ वाजता अचानक राजीनाम्याची बातमी आली. २१ जुलैपासून आजपर्यंत धनखड कुठे आहेत?त्यांची प्रकृती कसी आहे? ते बरे आहेत ना? मुळात ते आहेत ना? याची माहिती आम्हाला हवी आहे असा प्रश्नांचा भडीमार राऊतांनी केला. ते चीन,रशियात तर नाही ना, असा सवाल त्यांनी केला.

उद्धव ठाकरे दिल्लीला आले तेव्हा आम्ही कपिल सिब्बल यांच्या बाबत चर्चा केली आणि ज्यावेळी लोक मिळत नाहीत, त्यावेळी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करावा लागतो. मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्या व्यक्तीला शोधून आणण्यात येते. माजी उपराष्ट्रपती धनखड यांना शोधण्यासाठी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी असे आमचे मत झाल्याचा चिमटा राऊतांनी काढला. त्यामुळे धनखड यांना शोधण्यासाठी विरोधक खरंच सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस दाखल करणार का? हा चर्चेचा विषय ठरत आहे. तर जर अशी याचिका दाखल होत असेल तर ते सरकारचे अपयश नाही का? असे पण उलटबाजूने विचारणा होत आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर लागलीच राजीनामा दिला होता. संध्याकाळी त्यांनी राजीनामा सादर केला. त्यासाठी तब्यतेची कारण पुढे करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्याचा राजीनामाही लागलीच मंजूर करण्यात आला होता. या सर्व प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर मोठी टीका केली होती.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें