सायन कोळीवाड्यात भव्य ध्वजारोहण आणि तिरंगा बाइक रॅली; आमदार तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीचा जल्लोष
मुंबई – स्वातंत्र्य दिनानिमित्त सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने ध्वजारोहण आणि भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्या कार्यालयासमोर ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सकाळी १० वाजता कलपाक इस्टेट येथून बाइक रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली एमजीआर चौक, मक्कावाडी जंक्शन, सायन कोळीवाडा ब्रिज, सायन क्रोमा, सायन सर्कल, गांधी मार्केट, माटुंगा सर्कल, माटुंगा बावडाजी रोड, माटुंगा फ्लॉवर मार्केट, माटुंगा स्टेशन, रुया कॉलेज, रुया कॉलेज जंक्शन, फाईव्ह गार्डन, सेंट जोसेफ स्कूल, वडाळा ब्रिज, विद्यानकार कॉलेज, दोस्ती कॉलनी, अँटोपहिल दरगाह मार्गे पुन्हा सायन कोळीवाडा जंक्शन येथे पोहोचली.
यानंतर रॅलीने प्रतिषा नगर, मक्कावाडी जंक्शन, सायन कोळीवाडा ब्रिज, सायन सर्कल, सायन हॉस्पिटल, धारावी जंक्शन, ९० फूट रोड, सायन–माहीम रोड, ६० फूट रोड मार्गे गुरु तेग बहादुर जंक्शन हून आमदार तमिळ सेल्वन यांच्या कार्यालयात समारोप केला. सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील एकूण १० ठिकाणी आमदार तमिळ सेल्वन यांनी ध्वजारोहण केले. सायन कोळीवाडा आणि धारावी परिसरात नागरिक व कार्यकर्त्यांनी फुलवृष्टी, शाल परिधान आणि आरती करून त्यांचे भव्य स्वागत केले.
या देशभक्तीपूर्ण कार्यक्रमात सुमारे ५०० बाइक्स, हजारो नागरिक, कार्यकर्ते, मंडळ अध्यक्ष आणि प्रभाग अध्यक्ष सहभागी झाले. “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय” च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. कॅप्टन आर. तमिळ सेल्वन, आमदार व मुंबई, भाजप उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.