• Sun. Oct 19th, 2025

उद्धव ठाकरेनां मोठा धक्का!ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या संजना घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश.



उद्धव ठाकरेनां मोठा धक्का!ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या संजना घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश.

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ठाकरे गट) महिला उपनेत्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या पतींसह त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश करून ठाकरे गटाला दणका दिला आहे.

दहिसर भागातून घाडी दाम्पत्य शिवसेनेचे नगरसेवक म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या पक्षाच्या प्रवक्त्यांच्या यादीतही घाडी यांचे नाव होते. मात्र, पक्षातील अंतर्गत घडामोडी आणि निर्णयप्रक्रियेतील विसंगती यामुळे त्यांनी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षप्रवेशानंतर बोलताना संजना घाडी म्हणाल्या, “शिवसेना (ठाकरे गट) मध्ये निर्णय काही ठराविक टोळक्यांच्या मनाने घेतले जात होते. आम्ही निरीक्षक म्हणून प्रामाणिकपणे काम केले, मात्र तिकीट वाटपात आमच्या कामाची दखल घेतली गेली नाही.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “पक्षात काही लोक संघटना संपविण्याचे काम करत आहेत. आम्ही सगळ्यांशी संपर्क केला, पण कुणीही वेळ दिला नाही. शेवटी आम्हाला भेट देणं देखील टाळलं गेलं. त्यामुळे हा निर्णय आमच्या वैयक्तिक, संघटनात्मक आणि राज्याच्या हितासाठी योग्य वाटला.

ठाकरे गटासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठा राजकीय झटका मानली जात आहे. संजना घाडी यांच्यासारख्या कार्यकर्त्या पक्ष सोडत असल्याने पक्षातील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें