• Sun. Oct 19th, 2025

मुंबईत भाजप भाकरी फिरवणार; अध्यक्षपदासाठी अमित साटम आणि प्रवीण दरेकर स्पर्धेत, कॉमन फॅक्टर चर्चेत



मुंबईत भाजप भाकरी फिरवणार; अध्यक्षपदासाठी अमित साटम आणि प्रवीण दरेकर स्पर्धेत, कॉमन फॅक्टर चर्चेत

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – सत्ताधारी भारतीय जनता पक्षात लवकरच मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळणार आहे. मंडल अध्यक्षांपासून ते थेट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. मुंबईत भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी दोन बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. भाजपमध्ये स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटनात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांत होऊ शकते. मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी स्वबळावर लढलेल्या भाजपनं ३१ वरुन ८२ जागांवर झेप घेतली. या निवडणुकीत भाजपचं नेतृत्त्व आशिष शेलारांनी केलं होतं. त्यांच्याकडे मुंबई भाजपचं अध्यक्षपद होतं. आजही शेलारांकडेच मुंबई भाजपची सुत्रं आहेत.

मुंबई भाजपचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यासाठी पक्ष मुख्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्त्वात बैठक पार पडली या बैठकीला पक्षाचे मुंबईतील सगळे जिल्हाध्यक्ष आणि आमदार उपस्थित राहिले. मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर आणि अमित साटम यांची नावं चर्चेच आहेत. दरेकर यांचा प्रवास शिवसेना-मनसे-भाजप असा राहिला आहे. २००९ मध्ये ते पहिल्यांदा मनसेकडून आमदार झाले. उत्तर मुंबईतील मागाठाणे मतदारसंघातून ते निवडून आले. पण २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. उद्धन ठाकरे मुख्यमंत्री असताना ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर ते विधान परिषदेत पक्षाचे गटनेते झाले. मुंबई बँकेवर त्यांचं वर्चस्व आहे.

मुंबई भाजप अध्यक्षपदासाठी अमित साटम यांच्याही नावाची चर्चा आहे. ते अंधेरी पूर्व मतदारसंघातून सलग तीनवेळा विधानसभेवर गेले आहेत. २०१४, २०१९, २०२४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. विशेष म्हणजे तिन्हीवेळा त्यांचं मताधिक्क्य १५ हजारांहून अधिक राहिलं आहे. तिन्हीवेळा त्यांनी काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव केला. विशेष म्हणजे प्रविण दरेकर आणि अमित साटम हे दोन्ही नेते पश्चिम उपनगरातून येतात.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें