• Thu. Dec 18th, 2025

विरारमध्ये राजकारण तापणार ! हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र



विरारमध्ये राजकारण तापणार ! हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र

योगेश पांडे / वार्ताहर

विरार – नेहमीच एकतर्फी होणारी वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक यंदा मात्र अत्यंत चुरशीची होणार आहे. कारण नुकत्याच मतदान झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले शिवसेना भाजप वसई विरार मध्ये मात्र हितेंद्र ठाकूर यांचे राजकीय साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी एकत्र लढतायेत.. तर दुसरीकडे लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता महानगरपालिका देखील हातातून जाऊ नये म्हणून हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीची साथ घेतली आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. तब्बल दहा वर्षानंतर वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचे किंवा युती – आघाडीचे सरकार आले तरी वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाचा दबदबा कायम राहिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून निर्विवाद सत्ता असलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या हातून महापालिका हिसकावून घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेल्या शिवसेना (शिंदे) आणि भाजप एकत्र येत महायुतीच्या माध्यमातून लढणार आहेत.

यासंदर्भात नुकतीच नालासोपारा येथे दोन्ही पक्षांची बैठक पार पडली असून महायुती टिकवण्यासाठी सर्व पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील, आणि वसई विरार महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास देखील माहितीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीला भाजपच्या आमदार स्नेहा दुबे, आमदार शिवसेने नेते पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे आदी उपस्थित होते.

तर दुसरीकडे लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी आता महानगरपालिका देखील हातातून जाऊ नये म्हणून महाविकास आघाडीची साथ घेतली आहे. महाविकास आघाडीला देखील अस्तित्व टिकवण्यासाठी हितेंद्र ठाकूर आणि शिवाय पर्याय उरलेला नसल्याने एकेकाळचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे विजय पाटील, ओनिल आल्मेडा, विकास वर्तक यांच्यासह, मनसे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन, भाजपचा उधळलेला वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर सकर्वांचे एकमत झाले आहे.

माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांची विरारच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते विजय पाटील, ओनिल आल्मेडा, विकास वर्तक. ठाकरेंच्या शिवसेकडून विलास पोतनीस आणि अमोल कीर्तिकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घेत एकत्र लढण्याचे ठरवले आहे. शिवाय भाजपकडे लायक लोक नाहीत त्यामुळे त्यांनी आमच्याकडून उधार घेतले आहेत असा टोला बहुजन विकास आघाडीतून भाजपमध्ये होणाऱ्या प्रक्षेप प्रवेशाबाबत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी लागवला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें