• Thu. Dec 18th, 2025

माणिकराव कोकाटे रुग्णालयात असल्याने तुर्तास अभय!



माणिकराव कोकाटे रुग्णालयात असल्याने तुर्तास अभय!

नाशिक पोलिसांनी भावाकडे मोर्चा वळवला; विजय कोकाटेंना हुडकून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या १९९५ सालच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता पोलिसांची कारवाई वेगाने सुरू झाली आहे. मात्र माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, नाशिक पोलिसांनी आता त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.

नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या अटकेबाबत सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

दुसरीकडे, विजय कोकाटे हे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. विजय कोकाटेंनाही या प्रकरणात सरकारची फसवणूक करत शासकीय सदनिका लाटल्याबद्दल दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्यावरही अटक वॉरंट लागू आहे. विजय कोकाटेंना अटक करण्यासाठी पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आता विजय कोकाटे यांना पोलीस नेमकं कधी ताब्यात घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें