• Thu. Oct 8th, 2026

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले; पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका



पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले; पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारवर टीका

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या तरुणाने पुण्यात जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपरफुटी आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

प्रथमेश हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील रहिवासी असून, त्याच्यावर सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. आर्थिक अडचणींमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, MPSC परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका करत MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीप्रकरणी सरकारने जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी प्रथमेशच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत विद्यार्थ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची मागणी त्यांनी केली.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें