• Fri. Jun 5th, 2026

करडे घाटात गँगवार; कारची धडक देत बेछूट गोळीबार, सराईत गुन्हेगार विशाल काळे ठार



करडे घाटात गँगवार; कारची धडक देत बेछूट गोळीबार, सराईत गुन्हेगार विशाल काळे ठार

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : शिरूर तालुक्यातील करडे घाट परिसरात दोन गुन्हेगार टोळ्यांमधील जुन्या वैमनस्यातून झालेल्या थरारक गँगवारमध्ये सराईत गुन्हेगार विशाल काळे याचा मृत्यू झाला. कारने पाठलाग करून एकमेकांच्या वाहनांना धडक दिल्यानंतर झालेल्या बेछूट गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, करडे घाट परिसरात रविवारी दोन गुन्हेगार गट आमनेसामने आले. जुन्या वादातून दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळून आला. यावेळी एकमेकांचा पाठलाग करत कारने धडक देण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचे समोर आले आहे.

या गोळीबारात विशाल काळे याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशाल काळे हा सराईत गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या नोंदीत असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची नाकेबंदी केली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू आहे.

दरम्यान, भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे शिरूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या वर्चस्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें