• Fri. Oct 24th, 2025

भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला; दिली मोठी गुड न्यूज



भाजपचा बडा नेता अचानक शरद पवारांच्या भेटीला; दिली मोठी गुड न्यूज

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू आहे, दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राजकीय वर्तुळात देखील दिवाळीनिमित्त नेत्यांच्या भेटीगाठी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकमेकांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्यानंतर आता या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिलव्हर ओकवर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. या भेटीदरम्यान प्रसाद लाड यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लाड कुटुंबाच्यावतीने दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच “ मी आजोबा झालो, माझ्या मुलीला मुलगा झाला” ही आनंदाची बातमी देखील त्यांनी यावेळी पवार यांना सांगितली.

दरम्यान दुसरीकडे राज्यात सध्या दिवाळीसोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची देखील धामधूम सुरू आहे. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात सध्या असलेली राजकीय परिस्थिती पहाता या निवडणुकांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या निवडणुका कशा लढणार युतीमध्ये की स्वबळावर हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान आता महायुतीचं चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे, समोर आलेल्या माहितीनुसार जिथे -जिथे विरोधकांना फायदा होणार आहे, तिथे-तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र लढणार आहेत, तर काही ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी या निवडणुकांना कसं समोर जाणार? हे अजूनही अस्पष्ट आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें