• Fri. Feb 6th, 2026

डॉन अरुण गवळींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार



डॉन अरुण गवळींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार सुरु केली आहे. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाली आहे. अशातच आता मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट येणार आहे. डॉन अरुण गवळींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणूक लढणार आहेत. याला कारण ठरणार आहे ती शिंदेची शिवसेना.

मुंबईत अरुण गवळींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी विरोधात भावजय आणि माजी नगरसेविका वंदना गवळी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. वंदना गवळी आणि योगिता गवळी यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अरुण गवळींच्या घरातील आणखी एक व्यक्ती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे .

अरुण गवळी यांची मोठी कन्या गिता गवळी याही मुंबई महापालिकेत नगरसेविका राहिल्या आहेत. त्याही यावेळी निवडणूक लढवणार असून त्यांची धाकटी बहिणही आता मैदानात उतरणार आहे. अरुण गवळी यांच्या भावाची बायको वंदना गवळी याही नगरसेविका राहिल्या आहेत. परंतु त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. काही दिवासांपूर्वीच डॉन अरुण गवळी जेलमधून बाहेर आले. अरुण गवळी सक्रीय राजकारणात उतरणार नाहीत, पण त्यांची अखिल भारतीय सेना मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. अरूण गवळी यांची मुलगी आणि माजी नगरसेविका गीता गवळी यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणूक लढवली जाणार. अरूण गवळी यांच्या दोन्ही मुली निवडणूक लढवणार. अरूण गवळींची दुसरी मुलगी योगिता गवळीही पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें