• Fri. Jun 5th, 2026

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?



एकनाथ शिंदेंना मोठा धक्का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शायना एन.सी. नाराज; अजित पवार गटात जाण्याची दाट शक्यता

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे गटातील अनेक आमदार आणि खासदारांच्या संपर्कात असून, त्यामुळे विरोधी पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे. पण दुसरीकडे मात्र, खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्या आणि प्रवक्त्या शायना एन.सी. पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांनी राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शायना एन.सी. या मूळच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय नेत्या होत्या पण भाजपमध्येच त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. पण विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्या. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून तिकीटही दिले. परंतु निवडणुकीच्या निकालात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. असे असतानाही त्यांनी टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर शिवसेनेचा आक्रमकपणे बचाव करताना दिसल्या.

वृत्तानुसार, शायना एनसी यांच्या असंतोषाचे मुख्य कारण विधान परिषदेच्या निवडणुका आहेत. शिवसेना आपल्याला विधान परिषदेसाठी उमेदवारी देईल अशी त्यांना मोठी आशा होती, पण त्यांना या निवडणुकीत उमेदवारी डावलली गेली. त्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राजकीय तज्ज्ञांच्या मते, पक्षात दुर्लक्षित झाल्याची भावना असल्याने त्या आता नवीन पर्याय शोधत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, शायना एनसी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची औपचारिक भेट घेतली. तेव्हा या अटकळांना आणखी जोर आला. या भेटीमुळे त्या लवकरच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) सामील होऊ शकतात, अशी शक्यात निर्माण झाली आहे. असे झाल्यास, शिंदे गटासाठी हा एक मोठा संघटनात्मक धक्का असेल.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें