• Thu. Jul 23rd, 2026

२३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; वंचित बहुजन आघाडीचे समविचारी पक्षांना आवाहन



२३ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; वंचित बहुजन आघाडीचे समविचारी पक्षांना आवाहन

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी समविचारी राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी आंदोलनाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे सांगत दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर टीका केली. लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी संसदेत आक्रमक भूमिका घेतली असून, संसदेबाहेरही विविध पक्षांकडून आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २३ जुलैच्या बंदला इतर विरोधी पक्षांचा कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें