धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे – आदित्य ठाकरे.
नीट पेपरफुटी प्रकणावरुन २४ तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – नीट पेपरफुटी प्रकणावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिली आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाने देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जात जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. तुमचं सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. येत्या २४ तारखेला चार वाजता शिवाजी पार्क येथे एकत्र राष्ट्रगीत गायन करणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांमध्ये अजून संवेदनशीलपणा आहे. दिल्लीप्रमाणे मुंबई पोलिसांनी लाठी चार्ज केला नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले. २४ तारखेला कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही तर भारताच्या झेंड्याखाली पुन्हा एकत्र येऊया आणि राष्ट्रगान गाऊया असे आवाहन असे आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केलं आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँकरोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी अभिजीत दीपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे. महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली आहे, महाराष्ट्र तुमच्यासोबत उभा आहे. महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय, याचा अभिमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अभिजीत दीपके यानं एक ठिणगी पेटवली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावले त्यांचे फोटो इथं लावले आहेत. स्वतंत्र देशात विद्यार्थी पेपरफुटीमुळे आत्महत्या करत आहेत, आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावं लागेल. निवडणुकीला तीन वर्ष आहेत, खूप वेळ आहे, आता आपलं युद्ध सुरु झालं आहे. फक्त एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

