• Thu. Oct 8th, 2026

मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांकडून १२ कार्यक्रमांची घोषणा



मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांकडून १२ कार्यक्रमांची घोषणा

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर विविध उपक्रम

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून देशभरात महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मुंबईत केली. या अभियानाचा कालावधी १७ ऑक्टोबरपर्यंत असून, त्याअंतर्गत १२ विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिरे, आभार प्रदर्शन, ‘नमो सेवा’, संगीत-नाट्यमय प्रस्तुती, अंगणवाडी सेवा, ‘सेवा ज्योती कलश यात्रा’, वाडनगर-वाराणसी आणि वाराणसी-वाडनगर यात्रा, ‘सेवा सेतू’ अभियान तसेच ब्लॉक व तालुका स्तरावर सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे शाह यांनी सांगितले.

मुंबईतील पत्रकार परिषदेत शाह यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि विकासकामांचा आढावा घेतला. कलम ३७० हटविणे, नक्षलवादाविरोधातील कारवाई, पीएम-किसान, उज्ज्वला योजना, लखपती दीदी, रेल्वे आधुनिकीकरण तसेच राम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर आणि चांद्रयान-३ यांसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें