• Sun. Oct 19th, 2025

लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी ग्वाही; लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार



लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी ग्वाही; लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार

योगेश पांडे / वार्ताहर 

नांदेड – विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मतांचे पारडे जड झाले. महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० हजार रुपये दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी लाडक्या बहि‍णींना माहिती दिली. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपये शासनाच्या वतीने दिले जातात. यासाठी ४५ हजार कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही. उलट आम्ही नवीन प्रस्ताव आणला आहे. काही बँका पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील बँकेसोबत मी बोलणार आहे. काही सहकारी बँका चांगल्या आहेत. दरमहा दीड हजार रूपये भगिनीला जातात. त्याऐवजी ४० हजार रूपयांपर्यंत उद्योग, व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून द्यायचे व कर्जाचा हप्त योजनेतून वळता केला जाईल.

अजित पवारांनी पुढे नमूद केले की, ५० हजारांचे रूपये भांडवल झाले तर, बहिणी स्वत:चा व्यवसाय करू शकतील, कुटूंब उभं करू शकतात. महाराष्ट्रात काहींनी असे केले आहे. शेवटी कितीही सांगून प्रश्न सुटत नाही. काही कार्यक्रम द्यावा लागतो. आपण त्याचे स्वागत करावे. तसेच शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी जे वीजबील येते ते शासनाच्या वतीने महावितरणकडे भरले जाते. त्यासाठी महिना २० हजार कोटी रुपायंचा खर्च आहे. तो आटोक्यात आणायचा आहे. परंतु शेतकऱ्यांना दिवसा सुद्धा वीज उपलब्ध झाली पाहिजे, यासाठी सोलार पॅनेल बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे यापुढे लवकरच शेतकऱ्यांना हक्क व हमीची वीज उपलब्ध होईल, असे उपमुख्यमंत्री पवारांनी आश्वस्त केले आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें