• Sun. Oct 19th, 2025

राज ठाकरेंनी आखली पक्षबांधणीची नवी रणनीती; महापालिका निवडणुकीत मनसे ताकद दाखवणार



राज ठाकरेंनी आखली पक्षबांधणीची नवी रणनीती; महापालिका निवडणुकीत मनसे ताकद दाखवणार

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – राज ठाकरेंनी सोमवारी पुण्यात झालेल्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीत पक्ष बांधणीच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. पक्षबांधणीसंबंधी नवीन रणनितीही सांगितली. येत्या चार महिन्यात राज्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहे त्यानिमित्ताने राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, पुणे महापालिका निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवायची आहे. ज्याला नगरसेवक व्हायचंय त्यांने पक्ष बांधणी करायलाच हवी. सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्ष बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी या बैठकीत दिले. येणारी महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवायची असून जे शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष आणि राजदूत आहे त्यांनी कामाला लागावे.

संघटन बांधणीसाठी राज ठाकरेंनी एक महत्त्वाची सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना केली आहे. ती अशी की प्रत्येक १०० माणसामागे एक पदाधिकारी असायला हवा. ज्यामुळे पक्षाचा सर्वच लोकांशी जोडला जाईल. राज ठाकरेंची ही रणनिती येत्या काळात सर्वच स्थानिक स्तरावर राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहे. पुण्यात २०१७ च्या निवडणुकीत मनसेचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले होते. त्यातील वसंत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. २०१२ च्या निवडणुकीत मनसेला जबरदस्त यश मिळाले होते. त्या निवडणुकीत त्यांचे २९ नगरसेवक निवडून आले होते.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें