• Sun. Oct 19th, 2025

उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश



उद्धव-राज एकत्र येणार? वर्धापन दिनाच्या भाषणानंतर ठाकरेंचा नवा आदेश

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यात सर्वत्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत मुंबई महापालिकेची निवडणूक ही यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. मुंबई महापालिका जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नाचं अद्याप उत्तर मिळालेलं नाही. शिवसेनेचा वर्धापन दिन कार्यक्रम गुरुवारी झाला. या कार्यक्रमातील भाषणात उद्धव ठाकरे याबाबत घोषणा करतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. पण, ठाकरेंनी कोणतीही ठोस घोषणा केली नाही. राज्यातील २०१९ मधील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली. या आघाडीला (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट) लोकसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं. पण, विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला. या पराभवानंतर महाविकास आघाडी एकत्र आहे की नाही? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ही आघाडी कायम राहणार का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मविआच्या भवितव्य अनिश्चित आहे. त्याचवेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या. राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही मनसेशी युतीबाबत ते सकारात्मक होते. शुक्रवारी सेना भवनमध्ये ठाकरे गटाची बैठक झाली. या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली. पण, त्याचबरोबर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आदेशही दिले. युती महाविकास आघाडीशी करायची की मनसे सोबत करायची हे स्थानिक पातळीवर नेत्यांनी ठरवायचं आहे. स्थानिकांनी ठरवून एका महिन्यात अहवाल द्यायचा आहे. प्रत्येक ठिकाणी कुणासोबत युती करणे फायदेशीर आहे याचा स्थानिक पातळीवर आढावा घ्यावा. त्यानंतर त्याबाबत एका महिन्याच्या आत कळवण्याचे आदेश, ठाकरे यांनी दिले आहेत. एकीकडे मनसे आणि शिवसेनेची युती सुरु असताना नेत्यांची वेगळवेगळी मत समोर येतं आहेत. ‘आता उद्धव ठाकरेंना उत्साह कसा आला ? २०१९ ला जर हा सर्व्हे केला असता तर आज शिवसेना फुटली नसती…. २०१४ आणि २०१७ साली जेव्हा आम्ही एक पाऊल पुढे घेतलं तेव्हा का युती सुचली नाही? असा सवाल मनसे नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ठाकरे बंधुंच्या दिलजमाईचा मार्ग अजूनही सोपा नाही, असंच मत व्यक्त केलं जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें