• Sun. Oct 19th, 2025

देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही – उद्धव ठाकरे



देशाला पंतप्रधान, गृहमंत्र्यांची गरज, घरफोड्यांची नाही – उद्धव ठाकरे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर, मुंबईत शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा; मुंबईतील राजकीय वातावरण तापलं

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. आज मुंबईत शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे. या वर्धापनाच्या दिवशीच उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने पाळलेली बेडकं आज डराव डराव करतील. ही पाळीव बेडकं डोळ्यासमोर येतात. या चोरांना खरंच मी म्हणेल लाज लज्जा शरम ठेवली नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कुणाच्याही नशिबात किंवा भाग्यात असं प्रेम लिहिलं असेल. ही माझी पुण्याई नाही. ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. तुमच्या सर्वांचं अतोनात प्रेम आहे. काही लोकांनी शिवाजी पार्कात मैदानात घ्यायची घाई करू नका म्हणून सांगितलं. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले काय व्हायचं ते होईल. पण मी शिवाजी पार्कात सभा घेईल. शिवाजी पार्कात सभा घेतली. मी समोर माँ सोबत बसलो होतो. आज जे दाढी खाजवतात, ते कुठे होते माहीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आमच्यावर टीका करतात. अरे तुला पोरं होत नाहीत. आम्ही काय करू. भाजपचे लोक असेच आहेत. आपण सत्य नाकारतो का कधी. त्यांना आजपर्यंत कधी पोरं झाली नाही. म्हणून दुसरे नेते स्वीकारायचे आणि त्यांना मोठं करायचं. दुर्देव असं की ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली. त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा उभारला. हे यांचं हिंदुत्व. असा हा भाजपा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनीशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाही. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळतील. अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता म्हणतात. मग माता भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता. केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला, रेल्वे अपघात झाला कोणी जबाबदारी घेत नाही. मेट्रोत पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपला पंतप्रधान आहे. देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगाची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे. तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात, अशा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला. मोदींना विचारतोय, पंतप्रधानांना कठोर शब्दात बोलणं योग्य नाही. इंडिया आघाडी उभी केली तर इंडियन मुजाहिद्दीन बरोबर आमची तुलना करायला लाज वाटली नाही. जर आम्ही इंडियन मुजाहिद्दीन सारखे होतो तर तुम्ही न केलेल्या शौर्याचं कौतुक जगात करायला आमच्या पक्षाचे खासदार का पाठवले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें