• Sun. Oct 19th, 2025

सरकारी नोकरदांराना आर्थिक तंगी होऊ नये म्हणून ५ दिवस आधीच पगार मिळणार; राज्य सरकारकडून मोठा निर्णय



सरकारी नोकरदांराना आर्थिक तंगी होऊ नये म्हणून ५ दिवस आधीच पगार मिळणार; राज्य सरकारकडून मोठा निर्णय

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन २६ ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, साहजिकच सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सावाचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राज्य सरकारकडून शासन निर्णय काढून १ सप्टेंबर रोजी होणारे कर्मचारी व अधिकार्यांचे वेतन २६ ऑगस्ट रोजी देण्यास सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह परिषद, मान्यता प्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषि विद्यापीठे/ कृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवृत वेतनधारकांन / कुटुंब निवृत वेतन धारक यांनाही हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे, या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाला तब्बल ५ दिवस आधीच आपला पगार मिळणार आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळाती खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची आतुरता घरोघरी पाहायला मिळते, त्यासाठी मंडप सजावट ते गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अधिक खर्च करत भाविक सेलिब्रेशन करतात. त्यामुळेच, सरकारने ५ दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना रात्री बारा वाजेपर्यंत देखावे दाखवण्यासाठी शेवटचे पाच दिवस दिले जाणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे दिली आहे. याबाबतचा आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत, असेही ते म्हणाले. यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. त्यासाठी “गणेशोत्सव २०२५ – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें