• Sun. Oct 19th, 2025

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी; पुण्याच्या रुग्णाला दिली पाच लाखांची मदत



शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी; पुण्याच्या रुग्णाला दिली पाच लाखांची मदत

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली आहे. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनाला अधिक गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें