• Sun. Oct 19th, 2025

नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईरसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश



नवी मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईरसह पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

योगेश पांडे/ वार्ताहर 

नवी मुंबई – नवी मुंबईतील उद्धव ठाकरे पक्षाचे नवी मुंबईचे माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नवी मुंबईत मोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या फूटीनंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. परंतु नवी मुंबईत अनेक माजी नगरसेवक ठाकरे गटामध्ये होते. यामध्ये माजी नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांचा सामावेश होता. द्वारकानाथ भोईर हे नवी मुंबईत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख होते. रविवारी त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. द्वारकानाथ भोईर यांच्यासह माजी नगरसेवक दयानंद माने, मधूकर राऊत, मेघाली मधूकर राऊत, उपशहर प्रमुख संजय देसाई यांच्यासह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

नवी मुंबईत मागील काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्यास सुरूवात केली आहे. त्यातच, आता माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करत असल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें