• Sun. Oct 19th, 2025

उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील – केदार दिघे



उद्धव व राज ठाकरे हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील – केदार दिघे

राज व उद्धव यांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकली असताना एकनाथ शिंदे भलतेच चिडले, पण केदार दिघेंच्या भूमिकेनं लक्ष वेधलं

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – महाराष्ट्रात ठाकरे बंधूंबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद छोटे असल्याचे सांगितल्यानंतर बंधू उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्तित्वाच्या तुलनेत त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यातील लढाई खूपच लहान असल्याचे मनसे प्रमुखांनी म्हटले आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी ९ मार्च २००६ रोजी पक्षाची स्थापना केली होती. दरम्यान, दोन्ही बंधूनी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जर ते एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल कारण जर वेगळे झालेले लोक एकत्र आले आणि एखाद्याचा वाद संपला तर ती चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट वाटण्याचे काय, पण त्यांनी ऑफर दिली आणि त्यांनी प्रतिसाद दिला याबद्दल आपण काय म्हणू शकतो?” दुसरीकडे, याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता भलतेच चिडल्याचे दिसून आले. अत्यंत रागाने अरे जाऊदे म्हणत त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाकरे बंधूच्या घडामोडींवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव साहेब व राज साहेब हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील.राज व उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकलेले असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टीकाटिपणी करू नये. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून युतीवर संयमी प्रतिक्रिया येत असताना मनसे नेत्यांकडून जुने मुद्दे समोर आणून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना कोणत्याही अटीशर्ती नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

दुसरीकडे, महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकारण वेगळे आहे. दानवे म्हणाले की, “दोघेही भाऊ आहेत, पण त्यांचे राजकारण वेगळे आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायचे असेल तर त्यांना एकमेकांशी बसून चर्चा करावी लागेल. ही चर्चा टीव्हीवर नाही तर खासगीत व्हायला हवी.” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी जर त्यांना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र यावे लागले तर राज ठाकरे त्यासाठी तयार आहेत. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा १३ जागा जिंकल्या. २०१४ मध्ये पक्षाची जागा १ वर आली. २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खाते उघडले गेले नाही. २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १०१ जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते पण फक्त १ उमेदवार जिंकला.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें