• Sun. Oct 19th, 2025

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा



यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात पहिला तर पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा

योगेश पांडे / वार्ताहर

नवी दिल्ली – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ति दुबे या उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे. अर्चित हा पुण्यातला रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.

युपीएससी परीक्षेत यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी आघाडी घेतली असून ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलने ३०३ वा क्रमांक मिळवला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें