• Sun. Oct 19th, 2025

भारत सहन करणार नाही, हे सैन्याने दाखवून दिलं”, ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया



भारत सहन करणार नाही, हे सैन्याने दाखवून दिलं”, ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – पहलगामवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार उत्तर दिलंय. भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकिस्तानमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ केले आहे. दहशतवाद्यांची हल्ले उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या ऑपरेशनमध्ये ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला करण्यात आला. हे हल्ले पहाटे १.३० च्या सुमारास बहावलपूर, कोटली आणि मुजफ्फराबादमध्ये झाले. पहलगामवरील हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारताकडून कडक पाऊले उचलण्यात आली. या हल्ल्यानंतर देशातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण बघायला मिळाले. ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. संपूर्ण देशातून लष्कराचे काैतुक केले जात आहे. या ऑपरेशन सिंदूरनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व भारतीयांकरिता हा दिवस अभिमानाचा आहे. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. भारत त्याचा योग्य पद्धतीने बदला घेईल आणि तो आज आपण घेतलेला आहे.

विशेष: ऑपरेशन सिंदूर हे नाव मला वाटते की, अधिक बोलके आहे. भारतीय सैन्याचे आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करू. एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे नऊ अड्डे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी हे उद्ध्वस्त करतानाचे पूर्ण शूटिंग करण्यात आल्याने कोणाला काही बोलण्यास जागा उरलेली नाहीये. यावेळी भारतीय सैन्याचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें