महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीतून बाहेर पडणार ?
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – महाराष्ट्राच्या राजाकराणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्यात महायुतीचे सरकार आहे. याच महायुतीला मोठा झटका बसणार आहे. एका बडा नेत्याचा पक्ष महायुतीतून बाहेर पडणार आहे. हा नेता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. समाज पक्षाचे नेते महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. कधी महायुतीसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आता नव्या वाट्यावर जाण्याची शक्यता आहे. अकोल्यात त्यांनी युपीए सोबत जाण्याचा अंदाज व्यक्त केलाय. महायुतीमध्ये त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला स्थान मिळत नसल्याने महादेव जानकर नाराज झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेससोबत जाण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहे.
महादेव जानकर यांनी नुकतीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहीजे, अशी मनातील खदखदही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान जानकर यांनी प्रत्यक्षपणे काँग्रेस सोबत जाणार असल्याचे म्हटले नसलं तरी आगामी काळात व्यवस्थित वाटाघाटी झाल्यास आम्ही युपीए सोबत जाऊ असेही जानकर म्हणाले. तर कर्जमाफीसाठी आपल्या पक्षाकडून लॉंग मार्च काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं संकेत शरद पवारांनी दिले होते.. त्याबाबत निर्णय़ सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी घ्यायचा असल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार एका कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून आता काँग्रेसनं प्रतिक्रिया दिलीय. शरद पवार महायुतीत गेल्यास महाविकास आघाडीवर परिणाम होणार नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.