• Sun. Oct 19th, 2025

दहावीच्या परीक्षेत नातवासह ६५ वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण.



दहावीच्या परीक्षेत नातवासह ६५ वर्षीय आजी उत्तीर्ण; मुंबईतील दोघांनाही मिळाले चांगले गुण.

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १३ मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यानंतर, विद्यार्थ्यांचे सेलीब्रेशन सुरू झाले असून पास झालेल्यांचे अभिनंदन केले जात आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होत आहे. तर, ३५ टक्के मिळवलेल्यांचाही सत्कार सन्मान झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा रात्र शाळांमधून अनेकांनी आपली दहावी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. अहिल्यानगरमध्ये एका वडापाव विक्रेत्या महिलेनं जिद्द, चिकाटीने १० वीची परीक्षा पास केली. तर, तेथील एका माजी सैनिकाने १० वी बोर्ड परीक्षा पास होऊन मुलासह आनंद साजरा केला. कारण, मुलगा आणि वडिल एकाचवेळी दहावी पास झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत नातवासह आजीनेही दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याने दौघांचेही कौतुक होत आहे.

मुंबईतील एका कुटुंबात आजी आणि नातवाने सोबतच दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये, दोघांनाही यश मिळाले असून नातवाहसह आजीदेखील चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. ६५ वर्षीय प्रभादेवी यांनी यंदाच दहावीची बोर्ड परीक्षा दिली असून त्यांना ५२ टक्के गुण मिळाले आहेत. तर, त्यांचा नातू सोहम हा ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे, त्यांच्या कुटुंबीयांत दहावीच्या निकालाचा डबल आनंद पाहायला मिळत आहे. १० वी पास झाल्याने मला मोठा आनंद झाला असून माझा नातू देखील चांगल्या गुणांनी पास झाल्यामुळे हा आनंद द्गिगुणीत झाला आहे. मी मराठी माध्यमातून पास झाले असून माझा मुलगा इंग्रजी मीडियमधून पास झाला आहे, अशी माहिती प्रभादेवी यांनी दिली. तसेच, मी परीक्षेला जात होते तेव्हा अनेकजण माझी आपुलकीने विचारपूस करत व आनंद व्यक्त करत होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. दरम्यान, राज्यात दहावी बोर्ड परीक्षाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, कोकण विभागाने ९८.८ टक्के निकाल घेत राज्यात बाजी मारली. महाराष्ट्रातील एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल ९४.१० लागला आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें