• Sun. Oct 19th, 2025

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा; पण काँग्रेस पक्ष हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत



मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा; पण काँग्रेस पक्ष हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणूकीचे वेध आता सगळ्यांना लागले आहेत आणि त्याची तयारी आता सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्वाची मानली जाते. विशेषत: गेल्या २-३ वर्षांमध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये हे चित्र आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. पण गेल्या २-३ वर्षांपासून राजकीय गणितं बदलत आहेत. एक पक्षाचे दोन गट झाले….. अनेक मनोमिलन होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत…. मात्र या सगळ्यात काँग्रेस पक्ष हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत सध्या तरी दिसून येतं आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महाविकास आघाडीची एकजूट होती. लोकसभा निवडणुकीत आघाडीनं दमदार यश मिळवलं. पण, विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात देखील आले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र राहणार की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. माध्यमांसमोर एक आहोत अशी प्रतिक्रिया दिली जाते. पण, तरीही अंतर्गत वाद वेळोवेळी बाहेर आले आहेत. त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र कसे महापालिका एकत्र लढणार हा देखील सवाल उपस्थित झाला आहे. हा प्रश्न उपस्थित होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील काही आमदार हे सत्तेत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अवघे १० आमदार काय करणार ही भूमिका त्यांच्या आमदारांच्या मनात आहे. त्यामुळे लवकरच सत्तेत सामील होण्याची इच्छा ही त्यांच्या आमदारांची आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष आणि मनसे यांच्या मानोमिलनाची चर्चा देखील सध्या जोर धरू लागली आहे. दोन भावंडांपैकी नेमकं कोण पाहिलं टाळी देतंय याच्या प्रतीक्षेत सगळे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत उरतो काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्ष साध्य ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत दिसून येतं आहे. दोन राष्ट्रवादी विलीन झाल्या आणि दोन भावांचं मनोमिलन झालं तर काँग्रेस स्वातंत्र्य लढणार ही त्यांची ठाम भूमिका आहे. मात्र ही दोन्ही गणितं झाली नाही तर मात्र महाविकास आघाडी म्हणून महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची तयारी मुंबई काँग्रेसने दाखवली आहे. २०१७ साली झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला ९३ जागा, भाजपला ८२ जागा, कॉंग्रेसला ३१ जागा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला ९ जागा मिळाल्या. मात्र भाजपाने माघार घेतल्यामुळे तिसर्‍या क्रमांकांवर असलेल्या कॉंग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद गेलं.२०१२साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेला ७५, काँग्रेस पक्षाला ५२ आणि भाजपला ३१ जागा मिळाल्या. मात्र यंदा काँग्रेसचे ५ तरी नगरसेवक निवडून येतील का हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे मुंबई काँग्रेस मधील अंतर्गत वाद. मुंबई काँग्रेस मध्ये सध्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या कारभावर प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी पक्ष श्रेष्टींकडे तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे ही दुभंगलेली परिस्थितीमधून काँग्रेस कसा मार्ग काढणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें