• Sun. Oct 19th, 2025

डोंबिवली पाठोपाठ दिव्यात भाजपला दुसरा धक्का !



डोंबिवली पाठोपाठ दिव्यात भाजपला दुसरा धक्का !

हिंदीसक्तीचा निर्णयावर भाजप पदाधिकाऱ्याने दिला राजीनामा; मराठी मोर्च्यात होणार सामील

योगेश पांडे / वार्ताहर

दिवा – महायुती सरकारने शाळेत पहिल्या वर्गापासून हिंदी विषयाची सक्ती केली आहे. या निर्णयामुळे राज्यात वाद पेटला आहे. मनसे आणि ठाकरे गटाने ५ जुलै रोजी मोर्चाची हाक दिली आहे. पण दुसरीकडे सत्ताधारी भाजपला पहिला धक्का बसला आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यामुळे मुंबईजवळील दिव्यातील भाजप पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना टॅग करत राजीनामा दिला आहे. डोंबिवली पाठोपाठ दिव्यात भाजपला हा दुसरा धक्का मानला जात आहे.

डोंबिवलीमध्ये गुरुवारी माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता दिव्यातील भाजप पदाधिकारी ॲड. रविराज दिवाकर बोटले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत सोडचिठ्ठी दिली आहे. राज्यात पहिलीपासून हिंदी लादण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून हे मला पटलं नाही म्हणून भारतीय जनता पक्ष – दिवा शिळ मंडळ कायदा सेल संयोजक या पदाचा मी राजीनामा देत आहे, असं ॲड. रविराज दिवाकर बोटले यांनी सांगितलं. तसंच,५ जुलैला जो मराठी मोर्चा आहे त्याला मी माझ्या सहकाऱ्यांचा पाठिंबा आहे. आम्ही सगळे या मोर्चामध्ये सामील होणार आहोत, असंही बोटले यांनी जाहीर करून टाकलं.

दरम्यान, ठाकरे गटाची आणि मनसे एकत्र येण्याची सुरूवात डोंबिवली मधून झाली. ५ जुलैला मराठीसाठी दोन्ही बंधू एकत्र येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. याबाबत ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय, तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे. आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब मराठी विरोधात एकत्र आल्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि हा मोर्चा बोलताना भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे. उद्धव साहेबांनी सर्व मराठी माणसांसाठी लिहिलेल एक पत्र आहे, सर्व डोंबिवलीतील प्रतिष्ठित लोक डॉक्टर वकील आणि सर्व मराठी कलाकार या सर्वांपर्यत आम्ही ते पत्र पोहोचवणार आहोत. डोंबिवलीतून मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चात सहभागी होतील आम्ही मनसे नेते राजू पाटलांना आवाहन करू की, आमच्यासोबत एकत्र लोकल मधून जाऊया आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊया, असे म्हात्रे यांनी सांगितलं.


नमस्कार 🙏 हमारे न्यूज पोर्टल - मे आपका स्वागत हैं ,यहाँ आपको हमेशा ताजा खबरों से रूबरू कराया जाएगा , खबर ओर विज्ञापन के लिए संपर्क करे +91 7400225100 ,हमारे यूट्यूब चैनल को सबस्क्राइब करें, साथ मे हमारे फेसबुक को लाइक जरूर करें