मुंबई राष्ट्रवादीला अध्यक्ष नाहीच; महापालिका निवडणुकीसाठी नवाब मलिक यांच्याकडे धुरा
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – गेल्या चार वर्षांपासून रखडलेली मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही होण्याची शक्यता असताना, सर्वच पक्षांनी त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय. असं असताना गेल्या १० महिन्यांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र अध्यक्ष मिळत नाही. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक ही राष्ट्रवादीला मुंबई अध्यक्षाविनाच लढवावी लागणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद हे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे होतं. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील १० महिन्यात नव्या अध्यक्षाची निवडच झाली नाही.
मुंबई महानगरसाठी अध्यक्षपद जाहीर केलं नसलं तरी राष्ट्रवादीने या समस्येवर तात्पुरता तोडगा काढल्याचं दिसंतय. नवाब मलिक हे मुंबई महापालिका निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. पक्षाकडून निवडणूक समिती स्थापन करण्यात अली असून त्याचे अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे काम करणार आहेत. या समितीमध्ये सना मलिक, झिशान सिद्धकी, संतोष धुवाळी यांचा समावेश आहे.